क्रिकेटपटूच्या छातीवर आदळला बॉल, हार्ट अॅटॅकने मृत्यू

क्रिकेटच्या मैदानात आणखी एक दु:खद घटना घडलीय. १८ वर्षीय जीशान मोहम्मदच्या छातीवर बॉल लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. 

Updated: Jan 26, 2015, 09:44 PM IST
क्रिकेटपटूच्या छातीवर आदळला बॉल, हार्ट अॅटॅकने मृत्यू title=

कराची: क्रिकेटच्या मैदानात आणखी एक दु:खद घटना घडलीय. १८ वर्षीय जीशान मोहम्मदच्या छातीवर बॉल लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. 

ओरांगी नगर राजकीय हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की, रविवारी क्लब मॅचदरम्यान क्रिकेटचा बॉल लागल्यानंतर त्याला हार्ट अॅटॅक आला आणि जीशानचा मृत्यू झाला.

हॉस्पिटलचे डॉक्टर समद म्हणाले, 'त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं मात्र तो मृत घोषित केलं गेलंय.' त्यांनी सांगितलं, 'आम्हाला सांगितलं गेलं की बॅटिंग करतांना फास्ट बॉलरचा बॉल जीशानच्या छातीवर आदळला आणि तो पिचवरच पडला.'

या घटनेच्या काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन फिल ह्युजचा पण शेफिल्ड शिल्ड मॅचदरम्यान बॉल लागल्यानं मृत्यू झाला होता. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीशानच्या कुटुंबियांनी त्याचं पार्थिव दफन केलंय. कोणताही गुन्हा नोंदवण्यात आला नाही, कारण ही दुर्घटना होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.