मुंबई : नॉटिंघम वन डे सध्या सुरू आहे... आणि याच वनडेमध्ये टीम इंडियाचा ‘कॅप्टन कूल’नं धोनीनं आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड रचलाय.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी 20) मिळून धोनीनं सगळ्यात जास्त स्टम्पिंग (स्टंप आऊट) करणारा जगभरातील पहिला विकेट कीपर बनलाय.
धोनीनं सध्या सुरु असलेल्य मॅचमध्ये आत्तापर्यंत दोन स्टंम्पिंग केलेत आणि त्याच्या नावावर आता एकूण 131 स्टम्पिंगची नोंद झालीय. या मॅचमध्ये स्टंम्पिंगसाठी धोनीची पहिली शिकार ठरला तो एलिस्टर कूक...
कार्डिफ वन डे मध्ये त्यानं स्टम्पिंग करून कुमार संघकाराच्या (129) रेकॉर्डची बरोबरी केली होती. संघकारानंही पाकिस्तानविरुद्ध रविवारी झालेली मॅच खेळली होती पण त्याला विकेट काही घेता आली नाही.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त स्टंप करणारे टॉप 5 विकेटकीपर :
खेळाडू | देश | मॅच | स्टंम्पिंग |
एम एस धोनी | भारत | 382* | 131 |
कुमार संगकारा | श्रीलंका आणि आयसीसी | 440 | 129 |
रोमेश कालूवितर्ना | श्रीलंका | 234 | 101 |
मोइन खान | पाकिस्तान | 277 | 93 |
अॅडम गिलख्रिस्ट | ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी | 391 | 92 |
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.