धोनी झाला भावूक

आयपीएलसाठी पुण्याकडून पहिल्यांदाच मैदानात उतरताना मी भावूक झालो, अशी कबुली रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिली आहे. 

Updated: Apr 10, 2016, 09:48 PM IST
धोनी झाला भावूक title=

मुंबई: आयपीएलसाठी पुण्याकडून पहिल्यांदाच मैदानात उतरताना मी भावूक झालो, अशी कबुली रायजिंग पुणे सुपरजायंट्सचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं दिली आहे. 

टॉससाठी मैदानात जातानाच्या त्या क्षणी मी भावूक झालो होतो. मी जेव्हा टी 20 क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा भारत, झारखंड आणि चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळलो. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच मी टॉससाठी मैदानात जाताना पिवळी सोडून वेगळी जर्सी घातली, त्यामुळे भावूक झाल्याचं धोनी म्हणाला. 

रायजिंग पुणे सुपरजायंट्सनं आपल्या पहिल्याच मॅचमध्ये गतविजेत्या मुंबईचा तब्बल 9 विकेट्सनं दारूण पराभव केला. 

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई सुपरकिंग्जच्या टीमवर आयपीएलमध्ये 2 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.