अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे, धोनीनं सुनावलं!

टेस्ट कॅप्टन विराट कोहली याच्या आक्रमकतेवर  भारताचा सीमित ओव्हर्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीननं बोट ठेवलंय. सोबतच, आपला अनुभवाचा सल्लाही त्यानं कोहलीला दिलाय. 

Updated: Oct 2, 2015, 01:59 PM IST
अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता नव्हे, धोनीनं सुनावलं! title=

धर्मशाळा : टेस्ट कॅप्टन विराट कोहली याच्या आक्रमकतेवर  भारताचा सीमित ओव्हर्सचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीननं बोट ठेवलंय. सोबतच, आपला अनुभवाचा सल्लाही त्यानं कोहलीला दिलाय. 

'माझ्यासाठी आक्रमकता म्हणजे, अपशब्द वापरणं किंवा शारीरिक हाणामारी करणं नव्हे... आणि टीमसाठी नियमांमध्ये खेळणं गरजेचं आहे' असं धोनीनं म्हटलंय. 

अधिक वाचा - भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे वेळापत्रक

विराट कोहली आपल्या आक्रमतेसाठी ओळखला जातो... तसंच कोहली अनेकदा आक्रमकतेचा सूरही आवळताना दिसतो. श्रीलंकेविरुद्ध कोलंबोमध्ये शेवटची टेस्ट खेळताना श्रीलंकेच्या बॅटसमनसोबत भिडल्यानं भारताचा बॉलर ईशांत शर्मा याला एका मॅचसाठी निलंबित करण्यात आलं होतं. त्यावेळी, कोहलीनं ईशांतचंच समर्थन केलं होतं. 

पण, धोनीच्या म्हणण्यानुसार, तो स्वत: आक्रमक खेळाच्या विरुद्ध नाही पण, नियमांमध्ये राहून खेळण्यावर त्याचा जास्त विश्वास आहे. मॅचपूर्वी झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो बोलत होता. 

एकमेकांशी हाणामारी करणं किंवा एकमेकांना अपशब्द वापरणं म्हणजे आक्रमकता असू शकत नाही. राहुल द्रविडनं म्हटलं होतं की फास्ट बॉलर्सच्या समोर चांगला फॉरवर्ड डिफेन्स म्हणजे आक्रमक खेळ आणि हेच तर महत्त्वपूर्ण आहे, असं धोनीनं म्हटलंय. आमचे खेळाडू आक्रमकतेला योग्य दिशेत आणणं शिकत आहेत, असंही धोनीनं म्हटलंय. 

आपल्याला हे निश्चित करावं लागेल की आपल्या आक्रमक खेळामुळे अनुशासनात्मक कारवाई होणार नाही. आम्ही आक्रमकतेनं खेळू पण नियमांमध्ये राहूनच, असाही त्यानं विश्वास व्यक्त केलाय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.