'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.  

Updated: Nov 6, 2015, 12:54 PM IST
'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं? title=

कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.  

पाकिस्तानी पत्रकार आरिफ निजामी यांनी हा गौप्यस्फोट केलाय. एका पार्टीदरम्यान, रेहमनं इमरानला विष देण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व दिलं जातंय कारण, निजामी यांनी आत्तापर्यंत अनेक ब्रेकिंग न्यूज आणि खुलासे दिलेत. 

अधिक वाचा - इमरानचा दुसऱ्या पत्नीसोबतही 'तलाक'; 10 महिन्यांतच संसार विस्कटला

रेहमला इमरानची राजनैतिक जबाबदारी आपल्या ताब्यात घ्यायची इच्छा होती, त्यासाठीच तिनं इमरानशी विवाह केला होता, असं म्हटलं जातंय. इमरानच्या एका मित्राच्या मदतीनं गुप्तचर संस्थांनी इमरानला याबद्दल अगोदरच सूचना केली होती.

इमराननं धाडला 'तलाक'चा ईमेल
पत्रकार निजामी यांच्या म्हणण्यानुसार, इमरान-रेहम यांच्यात अनेकदा भांडणंही झाली होती. 'तहरीक-ए-इसाफ' पक्ष कसा चालवला जावा, हे मी तुला सांगेन, असंही रेहमनं इमरानला म्हटलं होतं. 

रेहम एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी लंडनला गेली असतानाच इमराननं तिला 'तलाक'चा ईमेल धाडला होता. हा मेल पाहून रेहमला धक्काच बसला. 

रेहमनं नेत्यांकडून उकळले पैसे
पीटीआय नेत्यांकड़ून पैसे घेण्याचाही आरोप रेहमवर केला जातोय. एक सिनेमा बनवण्यासाठी तिनं हे पैसे घेतल्याचं म्हटलं जातंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.