भारताचा डबल धमाका : सायना-श्रीकांतनं पटकावला 'इंडिया ओपन सुपर सीरिज'

बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रविवारचा दिवस सुपरसंडे ठरला. वर्ल्ड नंबरवन सायना नेहवालनं इंडियन ओपन सुपर सिरीजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय... तर सायनापाठोपाठ किदाम्बी श्रीकांतनंही या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलंय. महत्त्वाचं म्हणजे, सायना आणि श्रीकांत या दोघांनी पहिल्यांदाच या स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय.

Updated: Mar 30, 2015, 08:53 AM IST
भारताचा डबल धमाका : सायना-श्रीकांतनं पटकावला 'इंडिया ओपन सुपर सीरिज' title=

नवी दिल्ली : बॅडमिंटनमध्ये भारतासाठी रविवारचा दिवस सुपरसंडे ठरला. वर्ल्ड नंबरवन सायना नेहवालनं इंडियन ओपन सुपर सिरीजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय... तर सायनापाठोपाठ किदाम्बी श्रीकांतनंही या स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलंय. महत्त्वाचं म्हणजे, सायना आणि श्रीकांत या दोघांनी पहिल्यांदाच या स्पर्धेचं जेतेपद मिळवलंय.

बॅडमिंटनमध्ये जागतिक क्रमावारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या सायना नेहवालने इंडियन ओपन सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनच्या करियरमधील हे पहिलं इंडियन ओपनचं विजेतेपद ठरलय. सायनाने फायनलमध्ये थायलंडच्या रेचनॉक इन्तॉनोनचा 21-16, 21-14नं पराभव करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान शनिवारीच सायनाने जागतिक क्रमावारीत नंबर वनचं स्थान पटकावलं होत. यानंतर सायानाने लगेचच इंडियन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. 

फुलराणी सायना नेहवालपाठोपाठ इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत किदाम्बी श्रीकांतनेही आपलं नाव कोरलंय.. डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सलसनवर त्यानं मात करत या स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय.. 18-21, 21-13, 21-12 असा त्यानं व्हिक्टरचा पराभव केलाय.. पहिल्यांदाच त्यानं इंडियन सुपर सिरीज स्पर्धेचं  अजिंक्यपद पटकावलंय.. के. श्रीकांतचा या सीझनमधला हा दुसरा विजय असून दोन्ही वेळा त्यानं प्रतिस्पर्धी व्हिक्टर अॅक्सलसनवर मात केलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.