फुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद

भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६,  २१-१४ असा जिंकला.  बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.

Updated: Mar 29, 2015, 09:38 PM IST
फुलराणी सायनाला इंडिया ओपनचं जेतेपद title=

नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहवालने इंडिया ओपनचं जेतेपद मिळवलंय. सायनाने या सुपर सीरिज स्पर्धेच्या फायनलमध्ये थायलंडच्या राचानोक इन्तानोनवर मात केली. सायनाने हा सामना २१-१६,  २१-१४ असा जिंकला.  बीडब्ल्यू स्पर्धेतील सायनाचं हे सोळावं जेतेपद आहे.
 
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठणारी सायना ही भारताची पहिली महिला ठरली असून तर दुसरी भारतीय आहे. याआधी प्रकाश पादुकोण यांनी अव्वल स्थानावर झेप घेतली होती. या स्पर्धेची फायनल गाठल्यामुळे कालच सायनाचं अव्वल रँकिंग पक्कं झालं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.