ड्वेन ब्राव्हो आणि क्रिस गेलचं कंडोम कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर

 वेस्ट इंडिजचा ऑल राउंडर आणि 'चॅम्पियन' फेम ड्वेन ब्राव्हो आणि धडकेबाज ओपनर यांनी पुन्हा मैदानाबाहेर एक रेकॉर्ड केले आहे. त्यांचा नवा चॅम्पियन व्हिडिओ आला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Updated: Oct 24, 2016, 08:06 PM IST
ड्वेन ब्राव्हो आणि क्रिस गेलचं कंडोम कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर  title=

मुंबई :  वेस्ट इंडिजचा ऑल राउंडर आणि 'चॅम्पियन' फेम ड्वेन ब्राव्हो आणि धडकेबाज ओपनर यांनी पुन्हा मैदानाबाहेर एक रेकॉर्ड केले आहे. त्यांचा नवा चॅम्पियन व्हिडिओ आला असून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पाहा व्हिडिओ...

स्कोअर या कंडोम कंपनीच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून ब्राव्हो आणि गेलची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोशनचा एक भाग म्हणून दोघांचा हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. 

ड्वेन ब्राव्होच्या चॅम्पियन या व्हिडिओने धुमाकूळ घातला होता. आता ओरिजनल चॅम्पियन गाणे हिंदी आणि इंग्लिश बोल वापरून तयार केले आहे. 

तीन दिवसांपूर्वी हा व्हिडिओ रिलिज करण्यात आला. त्याला २ लाख २ हजार ५७२ व्ह्यूज मिळाले होते. 

ब्राव्हो काय म्हणाला.... 

मला खूप आनंद होतोय की या पद्धतीचे गाणे म्हणायला मिळाले. याच व्हिडिओ खूप फ्रेश वाटतो आहे. यात आंतर आणि भारतीय गोष्टींचा वापर केला आहे. क्रिस आणि मी स्कोअरच्या टीमसोबत काम करताना खूप दंगा मस्ती केली. हे गाणे अपबीट, सुंदर आणि खूप देसी असल्याचे ब्राव्होने म्हटले आहे.