'हॉटेलमध्ये सात भूतं दिसली' ; इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर अंधश्रद्धेचं भूत

इंग्लंडचे नावाजलेल्या क्रिकेटपटूंच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचं भूत बसलंय. जंटलमन लोकांच्या शहरात इंग्लंडच्याच दोन क्रिकेटपटूंना भूतान झपाटल्याची चर्चा इंग्लंडमध्ये सुरू आहे. 

Updated: Jul 21, 2014, 06:41 PM IST
'हॉटेलमध्ये सात भूतं दिसली' ; इंग्लंडच्या क्रिकेटपटूंवर अंधश्रद्धेचं भूत title=

लंडन : इंग्लंडचे नावाजलेल्या क्रिकेटपटूंच्या मानगुटीवर अंधश्रद्धेचं भूत बसलंय. जंटलमन लोकांच्या शहरात इंग्लंडच्याच दोन क्रिकेटपटूंना भूतान झपाटल्याची चर्चा इंग्लंडमध्ये सुरू आहे. 

ज्या देशामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा प्रसार झाला, त्या देशात ही चर्चा सुरू आहे. लंडनच्या न्यूज पेपर्समध्येही भूताची हेडलाईन झळकलीय.
 
स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅट प्रायरला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भूत असल्याचा भास होत आहे. 
 
‘लँघम’ या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इंग्लंडची टीम सध्या मुक्कामी आहे. मात्र ब्रॉडचं म्हणणं आहे की, हे हॉटेल भुताने झपाटलंय.
 
या हॉटेलच्या गॅलरीत एकूण सात भूतं फिरतात, असं स्टुअर्ट ब्रॉडने म्हटलंय. तर बेन स्टोक्सच्या रुम नंबर 333 मध्ये भुतांनी जास्त उच्छाद मांडलाय.
 
ब्रॉडचा हा दावा ऐकूण ब्रिटीश खेळाडूंची झोप उडाली आहे. काही खेळाडूंनी आपली रूम बदलली आहे. इतकंच नाही तर खेळाडूंच्या बायकांनीही या हॉटेलमधील मुक्काम हलवण्यासाठी तगादा लावलाय.
 
श्रीलंका दौऱ्यातही इंग्लंडचा टी-20 चा कर्णधार स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅट प्रायरला याआधीच्या  असाच अनुभव आल्याचा दावाही ब्रॉडने म्हटलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.