नवी दिल्ली : टीम इंडियानं लॉर्डसवर इंग्लंड टीमला धोबीपछाड दिलीय. इंग्लंडच्या टीमला मायभूमीत आपल्या कर्मभूमी असलेल्या लॉर्डस मैदानावर टीम इंडियाकडून 95 रन्सनं पराभव स्वीकारावा लागलाय. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, ओव्हल पिच वर सू-सू करून पिचचा अपमान केल्यानंतर इंग्लंड टीमला एकही टेस्ट मॅच जिंकता आलेली नाहीय.
ओव्हल पिचवर खेळल्या गेलेल्या ‘त्या’ टेस्ट मॅचनंतर इंग्लंड टीमनं तब्बल नऊ टेस्ट मॅच खेळल्यात. त्यामध्ये, 7 मॅचमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलाय तर दोन टेस्ट ड्रॉ झाल्यात.
21 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2013 मध्ये ओवल टेस्ट मॅच ड्रॉ झाली होती आणि याचबरोबर इंग्लंड टीमनं एशेज सीरीज 3-0 नं जिंकली होती. याच विजयाचं सेलिब्रेशन करणाऱ्या इंग्लंडच्या खेळाडुंपैंकी तीन जण मैदानावरच सू-सू करताना आढळले होते. पण, या प्रकारामुळे खेळ जगतातील अनेकांना खेद वाटला होता. केविन पीटरसन, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे ते तीन खेळाडू होते. यापैंकी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे दोघे खेळाडू लॉर्डसवरच्या आत्ताच्या टेस्टमध्ये सहभागी झाले होते.
ओवल मॅचनंतर इंग्लंडची टीम ऑस्ट्रेलियात एशेज सीरिज खेळण्यासाठी गेली तिथं त्यांनी सीरिज 5-0 अशा फरकानं गमावली. त्यानंतर इंग्लंडनं दोन मॅचच्या सीरिजमध्ये श्रीलंकेशी दोन हात केले. या सीरिजमध्ये श्रीलंकेनं इंग्लंडला त्यांच्याच घरात धुवून टाकलं. या सीरिज अंतर्गत लॉर्डसमध्ये खेळण्यात आलेली मॅच ड्रॉ राहिली होती तर लीडसमध्ये श्रीलंकेनं इंग्लंडला 100 रनांनी मात दिली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.