एक्स गर्लफ्रेंडने फूटबॉलपटू रोनाल्डोबाबत केले धक्कादायक खुलासे

फुटबॉलचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेंड रशियन मॉडलने रोनाल्डोबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री इरिना श्याक ही विवाह करणार आहे. रोनाल्डोसोबत ब्रेकअपनंतर हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरची ती पत्नी होणार आहे. रोनाल्डोसोबत ती ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. 

Updated: Nov 7, 2016, 08:22 PM IST
एक्स गर्लफ्रेंडने फूटबॉलपटू रोनाल्डोबाबत केले धक्कादायक खुलासे title=

नवी दिल्ली : फुटबॉलचा बादशाह क्रिस्टियानो रोनाल्डोच्या एक्स गर्लफ्रेंड रशियन मॉडलने रोनाल्डोबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. अभिनेत्री इरिना श्याक ही विवाह करणार आहे. रोनाल्डोसोबत ब्रेकअपनंतर हॉलिवूड स्टार ब्रॅडली कूपरची ती पत्नी होणार आहे. रोनाल्डोसोबत ती ५ वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. 

रोनाल्डोसोबत रिलेशनमध्ये असतांना तिने त्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. रोनाल्डोचे अनेक तरुणींसोबत संबंध असल्याचं तिने म्हटलं आहे. रोनाल्डोचा फुटबॉलनंतर याच गोष्टीवर लक्ष असायचं असं देखील तिने म्हटलं आहे.

इरिना म्हणते की, रोनाल्डोचे मोबाईल आणि सोशल मीडियावरचे मॅसेज धक्कादायक आहेत. रिलेशनमध्ये असताना देखील तो इतर तरुणींना भेटण्यासाठी ऑफर करायचा. जेव्हा इरिनाने त्याचे हे मॅसेज पाहिले तेव्हा तिला ही गोष्ट कळाल्याचं तिने म्हटलं आहे. रोनाल्डोचे अनेक तरुणींसोबत शारिरीक संबंध होते. फुटबॉलनंतर त्याचं फक्त याच गोष्टीवर लक्ष असायचं असा खुलासा इरिनाने केला आहे. तिच्या या आरोपामुळे रोनाल्डोच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.