मेलबोर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये भारताच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे बाचाबाचीचे अनेक प्रसंग समोर आले. पण मेलबोर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये मात्र प्रेक्षकांना वेगळच दृष्य पाहायला मिळालं.
मेलबोर्नमध्ये झालेल्या या टी-20 मध्ये रन काढत असताना विराट कोहली पडला, तेव्हा ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनर कोहलीच्या मदतीला धावला. मैदानामध्ये पडलेल्या विराट कोहलीला त्यानं हात दिला आणि उठवलं
याआधी वनडे सीरिजमधल्या एका मॅचदरम्यान कोहलीनंच फॉकनरला टोमणा मारला होता. झोपेत आहेस का असं कोहली फॉकनरला म्हणाला होता. तर मेलबोर्नमध्ये झालेल्या वनडेमध्ये फॉकनरने विराटला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा याआधीही मी बरेच वेळा तुझी धुलाई केली आहे, असं प्रत्युत्तर कोहलीनं दिलं होतं.