ह्युजनं प्रेयसीसाठी पाठवलेले हेच ते अंतिम शब्द...

‘लव्ह यू... मिस यू... लव्ह यू... मिस यू’ हेच ते शब्द आहेत जे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजनं आपल्या प्रेयसीसाठी – मिगन सिम्पसन हिच्यासाठी पाठवले होते... हेच शब्द मिगनसाठी ह्युजचे शेवटचे शब्द ठरले... 

Updated: Dec 7, 2014, 06:27 PM IST
ह्युजनं प्रेयसीसाठी पाठवलेले हेच ते अंतिम शब्द... title=

सिडनी : ‘लव्ह यू... मिस यू... लव्ह यू... मिस यू’ हेच ते शब्द आहेत जे दिवंगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युजनं आपल्या प्रेयसीसाठी – मिगन सिम्पसन हिच्यासाठी पाठवले होते... हेच शब्द मिगनसाठी ह्युजचे शेवटचे शब्द ठरले... 

एक मॅसेज पाठवून ह्युजनं आपलं प्रेम मिगन सिम्पसन हिच्यासमोर व्यक्त केलं होतं. मिगन सुट्टी घालवण्यासाठी हवाई इथं गेली असताना ह्युजनं तिला हा मॅसेज पाठवला होता. त्यानंतर, थोड्याच वेळात ह्युजची घरगुती क्रिकेट मॅच दरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये विरोधी टीमचा खेळाडू सीन एबॉट याचा एक बाऊंसर लागून मृत्यू झाला होता. तो केवळ २५ वर्षांचा होता. 

मिगन हिनं दिलेल्या माहितीनुसार, तिची आणि ह्युजची पहिली भेट तीन वर्षांपूर्वी सिडनीतील एका ‘द पॅलेस’ नावाच्या पबमध्ये झाली होती. त्यानंतर थोड्याच वेळात ते एकमेकांच्या खूप जवळ आले होते. उल्लेखनीय म्हणजे, ह्युजनं मिगन हिच्यासमोर स्वत:ची ओळख एक बँकर म्हणून करून दिली होती. त्यावेळी, ह्युज कोण आहे आणि तो काय करतो, याची कल्पनाही मिगनला नव्हती. 

पहिल्या भेटीनंतर ठरल्याप्रमाणे पुढच्या आठवड्यातही त्यांची भेट झाली... आणि त्यानंतर या भेटीगाठी वाढतंच गेल्या... या भेटींचं कधी प्रेमात रुपांतर झालं हे त्यांनाही कळलं नाही. दोघंही आपल्या अफेबाबत खूपच गंभी होते. आपल्या होमटाऊन मॅक्सविलेला परतल्यानंतर हे दोघे लग्नाबाबत विचार करणार होते, असंही मिगननं म्हटलंय. 
 
ह्युजच्या अगदी जवळच्या मानल्या जाणाऱ्या कॅप्टन क्लार्कनंही मिगन हिची भेट घेऊन तिची विचारपूस केली. मिगनवर ह्युजचं किती प्रेम होतं हे क्लार्कनंच तिला सांगितलं होतं. दोघांनाही एकमेकांची आठवण आल्यावर ते एकमेकांना फोनवरून संपर्क करायचे... मॅसेज पाठवायचे... आणि अशाच मॅसेजपैंकी एक मॅसेज मिगनसाठी ह्युजचा अखेरचा मॅसेज ठरला.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.