नवी दिल्ली: २८ नोव्हेंबरला सेंट्रल स्टेग्ज आणि ओटेगा वोल्ट्समध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० मॅचदरम्यान एक विचित्र रन पाहायला मिळाला. आपण याला रन आऊटपासून वाचण्यासाठी बेस्ट अटेंप्ट पण म्हणू शकता.
हो सेंट्रल स्टेग्जचे बॅट्समन क्रूझर वॅन विक बॉलर अँडवर रन घ्यायला उभा होता. तर त्याचा सहकारी रयान टेन डेशकाटे बॅटिंग करत होता. त्यानं स्ट्रेट ड्राईव्ह खेळला. ज्याला बॉलरनं आपल्या हातांनी थांबवलं आणि बॅट्समनला रन आऊट करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सेंट्रलच्या बॅट्समन वॅन विकनं रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी असा अटेंप्ट केला. जे पाहून तुम्ही हैराण व्हाल. रन आऊट होऊ नये म्हणून तो ‘आर्मी मॅन स्टाइल’मध्ये जमिनीवर घसरत पुढे गेला. आपण त्याला ‘जल बिन मछली’ अटेंप्टही म्हणू शकता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.