पूरग्रस्तांसाठी आजी-माजी क्रिकेटपटूंंकडून मदत

चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजी-माजी क्रिकेटपटू धावून आले आहेत. मधावसू सामाजित संस्थेमार्फत क्रिकेटपटूंनी ही मदत केली आहे. 

Updated: Dec 24, 2015, 05:32 PM IST
पूरग्रस्तांसाठी आजी-माजी क्रिकेटपटूंंकडून मदत title=

नवी दिल्ली : चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजी-माजी क्रिकेटपटू धावून आले आहेत. मधावसू सामाजित संस्थेमार्फत क्रिकेटपटूंनी ही मदत केली आहे. 

झी मीडियाचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्रिकेटपटूंशी संपर्क साधताच क्रिकेटपटूंनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला.

 क्रिकेटपटूंनी दिलेल्या मदतीतून मधावसून संस्थेनं औषध, आणि ब्लँकेट्स पूरग्रस्तांना पुरवल्या आहेत. मदतीचा हात पुढे केलेल्यांमध्ये सचिन तेंडुलकरसह, महेंद्र सिंग धोनी, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर. अश्विन, हरभजन सिंग यांनी मदत केली. 

याखेरीज माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि कॉमेंटेटर हर्ष भोगले, विक्रम साठे यांनीदेखील पूरग्रस्तांना मदत केली आहे.