टेलर बनणार होता मात्र झाला क्रिकेटर, मिळाले वर्ल्डकपचे तिकीट

वडील टेलरिंगचे काम करायचे त्यामुळेच साहजिकच टेलरिंगचा व्यवसाय सांभाळण्याचे काम त्याच्याकडे येणार होते. मात्र त्याच्यात एक जिद्द होती क्रिकेटमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची. या जिद्दीनेच त्याला हा मार्ग दाखवला आणि त्याने १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप संघात नावही निश्चित केले. 

Updated: Dec 24, 2015, 01:36 PM IST
टेलर बनणार होता मात्र झाला क्रिकेटर, मिळाले वर्ल्डकपचे तिकीट     title=

नवी दिल्ली : वडील टेलरिंगचे काम करायचे त्यामुळेच साहजिकच टेलरिंगचा व्यवसाय सांभाळण्याचे काम त्याच्याकडे येणार होते. मात्र त्याच्यात एक जिद्द होती क्रिकेटमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची. या जिद्दीनेच त्याला हा मार्ग दाखवला आणि त्याने १९ वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप संघात नावही निश्चित केले. 

ही कहाणी आहे लखनऊच्या झीशान अन्सारीची. पुढील वर्षी २७ जानेवारीपासून बांगलादेशात सुरु होणाऱ्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात त्याची वर्णी लागलीये. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये राहणारा झीशान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज शेन वॉर्नला आदर्श मानतो. 

नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघाविरुद्ध झीशानने ११ विकेट घेतल्या. त्याच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे त्याने संघात स्थान मिळवलेय. त्याने टेलरिंग शिकावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. मात्र क्रिकेटर बनण्याच्या त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीने त्याचा मार्गच बदललाय. आता त्याच्या वडिलांचेही मत बदललेय. झीशाननेही स्टार क्रिकेटर बनावे अशी त्यांची इच्छा आहे.