अनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान

पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.

Updated: Jun 6, 2016, 10:53 AM IST
अनोख्या शैलीत सेहवागने पाकला दिले आव्हान title=

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक नुकतेच आयसीसीने जाहीर केले. या स्पर्धेसाठीही भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलंय.

पुढील वर्षी ४ जूनला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही अनोख्या शैलीत पाकला आव्हान केलंय.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये गोलंदाजांना पळता भुई करणारा सेहवाग मैदानाबाहेरही सोशल मीडियामध्ये पाकिस्ताविरुद्ध छक्के-चौके मारताना दिसतोय. चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सेहवागने ट्वीट केलेय.

या ट्विटमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी एक वर्ष उरलेय. माझी पाकिस्तानच्या चाहत्यांसाठी एकच विनवणी आहे की त्यांनी आपले टीव्ही फोडू नयेत. विजय-पराजय खेळाचा एक भाग आहे, असे म्हटलेय.