जोहान्सबर्ग : वेस्ट इंडीजने टी -२० च्या इतिहासात सर्वात जास्त धावांचं आव्हान पूर्ण करत, जोहान्सबर्गमध्ये खेळतांना दक्षिण आफ्रिकेला चार विकेटने हरवलं आहे.
या विजयासोबत तीन सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने २-० ची आघाडी घेतली आहे. पहिली बॅटिंग करतांना दक्षिण आफ्रिकेने मर्यादीत २० षटकांत ७ विकेट गमावून २३१ रन्स केल्या.
वेस्ट इंडीजने धाव संख्येचा पाठलाग करतांना १९.२ षटकांत ६ विकेट गमावून विजयाचं लक्ष्य साध्य केलं.
ख्रिस गेलचा हल्लाबोल
ख्रिस गेल वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला. गेलने ४१ चेंडूत ७ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या.
याशिवाय मार्लन सॅम्युअल्सने ३९ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार लगावत ६० धावा केल्या.
डॅरेन सॅमीचा शेवटचा हल्ला
सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात सामना दक्षिण आफ्रिकेच्या बाजून जात असतांना , वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीने फक्त ७ चेंडूत २० रन्स करून टीमला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन एफ डु प्लेसिसने फक्त ५६ चेंडूत ५ षटकार आणि ११ चौकार लगावत ११९ रन्स केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.