मॅक्सवेलची जादुई गोलंदाजी, पाकचा सुपडा साफ

 ग्लेन मॅक्सवेलने शेवटचे षटक मेडन टाकून दोन विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर एक धावेने रोमांचक विजय मिळविला. 

Updated: Oct 13, 2014, 05:27 PM IST
मॅक्सवेलची जादुई गोलंदाजी, पाकचा सुपडा साफ title=

अबुधाबी :  ग्लेन मॅक्सवेलने शेवटचे षटक मेडन टाकून दोन विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि शेवटच्या वन डे सामन्यात पाकिस्तानवर एक धावेने रोमांचक विजय मिळविला. 

विजयासाठी २३२ धावांचे लक्ष्यचा पाठलाग करताना पाकिस्तानला शेवटच्या षटकात दोन धावा पाहिजे. पण मॅक्सवेलने ५० व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर सोहेल तन्वीर (१०) आणि शेवटच्या चेंडूवर मोहम्मद इरफान (०) बाद केले आणि ऑस्ट्रेलियाने सिरीज ३-० अशी खिशात घातली. 
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्यांदा पाकिस्तानला व्हाइट वॉश दिला आहे. यापूर्वी १९९८मध्ये पाकिस्तानात आणि चार वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये ५-० ने नमवले होते. 

पाहूया शेवटचे रोमांचक षटक 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.