मुंबई : टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंग धोनी सगळ्यात श्रीमंत क्रिकेटर आणि पाचव्या क्रमांकावर सर्वात जास्त मानधन घेणारा खेळाडू आहे... हे आपल्याला माहितच आहे. पण, त्याच्यापेक्षाही जास्त कमाई त्याचे सिनियर आणि क्रिकेट कमेंट्री करणारे माजी क्रिकेटर रवि शास्त्री आणि सुनील गावसकर करताना दिसत आहे.
म्हणजे, भारतीय क्रिकेट बोर्डाकडून धोनी आणि विराट कोहलीपेक्षाही शास्त्री आणि गावसकर यांना जास्त मानधन मिळतं.
शास्त्री आणि गावसकर यांना बीसीसीआयकडून वार्षिक सहा करोड रुपयांचं वेतन मिळतं. दोघांचंही बीसीसीआयसोबत कमेंट्री कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यासाठी त्यांना चार करोड रुपये मिळतात. याशिवाय, नुकतंच रवि शास्त्री यांना टीम इंडियाचा संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलीय. याशिवाय त्यांना वार्षिक दोन करोड रुपये आणि दिले जाणार आहेत त्यामुळे त्यांची वार्षिक कमाई असेल सहा करोड रुपये.
दुसरीकडे सुनील गावसकर आयपीएल ऑपरेशन्सच्या अध्यक्षाच्या रुपात अतिरिक्त जबाबदारी सांभाळतात. यासाटी त्यांना वार्षिक दोन करोड रुपये मिळतात. त्यामुळे त्यांची वार्षिक कमाई सहा करोड रुपये होतेय.
महेंद्र सिंग धोनीनं गेल्या १२ महिन्यांत ३५ मॅच खेळून बीसीसीआयकडून २.५९ करोड रुपयांची कमाई केलीय. यामध्ये मॅच फीसोबतच एक करोड रुपयांच्या वार्षिक रिटेनर फीचाही समावश आहे. या दरम्यान, विराट कोहलीनं ३९ मॅच खेळून २.७५ करोड रुपयांची कमाई केलीय.
एका बीसीसीआय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, बीसीसीआय गावसकर आणि शास्त्री यांना कमेंटेटर म्हणून चार करोड रुपयांचं मानधन देतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुनील गावसकर यांना आयपीएलच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्यासाठी अतिरिक्त २.३७ करोड रुपये दिले जातात. रवि शास्त्री यांनाही इतकेच पैसे दिले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.