न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला जाणार इतिहास

वर्ल्ड कप २०१५च्या पहील्या सेमीफायनलमध्ये न्युझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रीका असा सामना होणार आहे. हा सामना कोणीही जिंकू इतिहास मात्र रचला जाणार हे मात्र निश्चित.

Updated: Mar 24, 2015, 12:28 PM IST
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात रचला जाणार  इतिहास title=

ऑकलंड : वर्ल्ड कप २०१५च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे. हा सामना कोणीही जिंकू इतिहास मात्र रचला जाणार हे मात्र निश्चित.

या पहील्या सेमीफायनलमध्ये जी टीम जिंकेल ती थेट 'वर्ल्ड कप २०१५' च्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. या टीमपैकी फायनलमध्ये पोहचली तरी तो एक नवा इतिहासच असणार आहे.

कारण वर्ल्ड कपच्या आजवरच्या इतिहासात न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी एकही टीम एकदाही फायनलमध्ये खेळलेली नाही.

न्यूझीलंडने यापूर्वी सहा वेळा आणि दक्षिण आफ्रिकेने तीन वेळा सेमीफायनल गाठली आहे, मात्र त्यांना फायनलमध्ये प्रवेश करण्यात यश मिळाले नव्हते. यंदाचा वर्ल्ड कपमध्ये या दोन्ही टीमपैकी एक टीम फायनलमध्ये जाणार हे निश्चित आहे आणि तो एक इतिहासच असणार आहे.