हॉकी इंडियाची रिओमध्ये गैरसोय

रिओ ऑलिम्पिकसाठी ब्राझिलमध्ये वास्तव्यास असलेल्या हॉकी इंडियाला पुरेशा सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. याविषयी संघाच्या प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक गेम्स चीफ राकेश गुप्ता यांना पत्राने कळवले आहे. 

Updated: Aug 2, 2016, 08:28 PM IST
हॉकी इंडियाची रिओमध्ये गैरसोय

नवी दिल्ली : रिओ ऑलिम्पिकसाठी ब्राझिलमध्ये वास्तव्यास असलेल्या हॉकी इंडियाला पुरेशा सुविधा मिळणेही कठीण झाले आहे. याविषयी संघाच्या प्रशिक्षकांनी ऑलिम्पिक गेम्स चीफ राकेश गुप्ता यांना पत्राने कळवले आहे. 

संघाला देण्यात आलेल्या खोलीत बीन बॅगशिवाय कोणतेही फर्निचर नाही. हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी याबाबतचा एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात हॉकी इंडियाचे खेळाडू बीन बॅगवर बसलेले दिसत आहेत. त्याशिवाय त्यांच्या खोलीत इतर कोणतेही सामान नाही.

बत्रा यांनी राकेश गुप्ता यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ‘तुम्ही तिथे सुट्टीसाठी गेला आहात का ?  हॉकी इंडियाच्या पत्राचे उत्तर द्यावेसे तुम्हाला वाटत नाही का ?’असे बत्रा यांनी म्हटले आहे