हॉकी : भारताचा फायनलमध्ये दारुण पराभव, ऑस्ट्रेलिया विजयी

सुलतान अझलन शाह हॉकी कपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-०ने पराभव पत्करावा लागला.

Updated: Apr 16, 2016, 08:56 PM IST

इपोह, मलेशिया : सुलतान अझलन शाह हॉकी कपच्या फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून ४-०ने पराभव पत्करावा लागला.

ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने नवव्यांदा सुलतान अझलान शाह हॉकी कपवर आपले नाव कोरले. भारताला गोल करण्याची एक संधी सुरुवातीला मिळाली होती. मात्र, या संधीचा लाभ उठवता आला नाही.
 
भारतवर ऑस्ट्रेलियाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. मध्यांतरापूर्वी ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली होती. क्रेगने २९व्या मिनिटाला पहिला आणि ३५ व्या मिनिटाला दुसरा गोल करत आघाडी घेतली. त्यानंतर मॅटने ४५व्या मिनिटाला ३ आणि ५८व्या मिनिटाला ४ गोल मारत भारतावर सहज विजय मिळवला.
 
ऑस्ट्रेलियाने कॅनडाला ३-० ने हरवत अंतिम सामन्यात धडक मारली होती. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या भारतीय संघाला स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा ६-१ अशा फरकाने धुरळा उडवत फायनलमध्ये धडक मारली. मात्र, आजच्या सामन्यात चांगला खेळ करता आला नाही.