आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये

 ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Updated: Mar 24, 2015, 04:45 PM IST
आफ्रिकेला ४ विकेटनं हरवून न्यूझीलंड फायनलमध्ये title=

ऑकलंड:  ग्रँट एलियट नॉटआऊट ८४ रन्सच्या शानदार बॅटिंगमुळं न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेचा ४ विकेट आणि १ बॉल राखून पराभव केला. न्यूझीलंडनं दमदारपणे वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारलीय. हाता - तोडांशी आलेली मॅच अशी गमावल्यानं दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एबी डिव्हिलियर्सच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अतिशय चुरशीच्या झालेल्या या सामन्यात २९८ रन्सचा पाठलाग करताना कॅप्टन मॅकलमनं २६ बॉल्समध्ये ५९ रन्स करत न्यूझीलंडला चांगली सुरूवात करून दिली. त्याला एलियटची भक्कम (नॉटआऊट ८४) साथ मिळाली. मॅकलम आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडचे इतर बॅट्समनही पटापट तंबूत परतले. मात्र एलियटनं कोरी अँडरसनसोबत (५८) रन्सची पार्टनरशिप करत सावध खेळ केला आणि न्यूझीलंडला विजय मिळवून देत फायनल गाठली. 

एरवी फिल्डिंगसाठी नंबर वन मानली जाणारी दक्षिण आफ्रिकेची टीम आज ढिसाळ फिल्डिंग करतांना दिसली.  रन आऊटच्या तीन संधी गमावल्या आणि 'चोकर्स'चा बसलेला शिक्का पुसून काढण्यात संघ पुन्हा अपयशी ठरला.

६ व्या ओव्हरमध्ये मॅकलम आऊट झाल्यानंतर पाठोपाठ ८ व्या ओव्हरमध्ये विल्यमसन अवघ्या सहा रन्सवर आऊट झाल्यानं न्यूझीलंडची स्थिती २ आऊट ८१ रन्स अशी होती. मागील मॅचमध्ये डबल सेंच्युरी ठोकणारा मार्टिन गपटील अवघ्या ३४ रन्सवर रन आऊट झाला तर रॉस टेलरला (३०) ड्युमिनीनं किपरकरवी कॅच आऊट केलं. तर स्टेनच्या बॉलिंगवर राँची ८ रन्सवर असताना आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेतर्फे मॉर्केलनं ३ तर स्टेन आणि ड्युमिनीनं प्रत्येकी १ विकेट घेतली.  

दरम्यान वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पावसाच्या व्यत्ययामुळं मॅच प्रत्येकी ४३ ओव्हरची खेळवण्यात आली. दक्षिण आफ्रिकेनं ४३ ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून २८१ रन्स केल्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार न्युझीलंडसमोर विजयासाठी २९८ रन्सचं टार्गेट होतं. पावसाच्या व्यत्ययामुळं खेळ काही वेळासाठी थांबवण्यात आला, तेव्हा आफ्रिकेनं ३८ ओव्हरमध्ये २१६ रन्स केले होते. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर आफ्रिकेच्या बॅट्समननी फटकेबाजी करत ४३ ओव्हरमध्ये २८१ रन्स केले. ड्यु प्लिसिसनं (८२) एबी डिव्हिलियर्सच्या ( नॉटआऊट ६५) साथीनं शानदार खेळी केली. न्युझीलंडतर्फे अँडरसननं ३ तर बोल्टनं २ विकेट घेतल्या. बाद केले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.