बंगळुरू : एम चेन्नास्वामी स्टेडियमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट सामन्यात अनेक न विसरणारे क्षणांचा अनुभव क्रिकेट रसिकांनी घेतला आहे.
ईशांत शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ यांच्याती स्लेजिंग पण यात सर्वात आठवणीत राहिला भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनचा एक जगलिंग करणारा कॅच.
मॅचच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर पीटर हँडसकॉम्बने लेगसाईडला हवेत चेंडू मारला. मिड विकेटवर उभ्या असलेल्या अश्विनने हवेत झेप घेऊन चेंडूपर्यंत पोहचला.
पहिल्या प्रयत्नात त्याला कॅच पकडता आला नाही. पण चेंडू त्याच्या दुसऱ्या हाताला लागला त्याने चेंडू जमिनीवर पडू दिला नाही आणि एक अप्रतिम झेल टीपला.