...तरच भारत पाकिस्तानात खेळेल : शुक्ला

पाकिस्तान भारतीय संघाला संपूर्ण सुरक्षेची हमी देत असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका लाहोरमध्ये खेळण्यास कोणतीही हरकत नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आणि आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. 

Updated: Nov 22, 2015, 10:12 AM IST
 ...तरच भारत पाकिस्तानात खेळेल : शुक्ला title=

कराची  : पाकिस्तान भारतीय संघाला संपूर्ण सुरक्षेची हमी देत असेल तर भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका लाहोरमध्ये खेळण्यास कोणतीही हरकत नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी आणि आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. 

तसेच पाकिस्तानने ही मालिका संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये खेळवण्यापेक्षा आपल्या देशात सुरक्षित खेळ कसा होईल याकडे लक्ष द्यावे असा सल्लाही शुक्ला यांनी यावेळी दिला. पाकिस्तानी न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी हे सांगितले.

'जर पाकिस्तानने यूएईमध्येच क्रिकेट खेळणे सुरु ठेवेल तर त्यांना नुकसान होईल. त्यापेक्षा लाहोरला खेळासाठी सुरक्षित स्थान बनवता येईल. पाकिस्तान स्टेडियमजवळ संघासाठी हॉटेल आणि पर्याप्त सुरक्षाव्यवस्था पुरवत असेल तर भारतीय संघाला लाहोरमध्ये खेळण्यास काही हरकत नाही,' असेही शुक्ला म्हणाले. त्याचप्रमाणे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सुरक्षेचे आश्वासन दिल्यास भारत लाहोरमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचेही ते म्हणाले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.