नवी दिल्ली : मायकल क्लार्कच्या 'ऍशेस डायरी 2015' या पुस्तकातनं क्रिकेट जगतामध्ये सध्या एकच खळबळ माजवली आहे.
ऍशेस... मदर ऑफ ऑल क्रिकेटींग बॅटल... ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील मैदनावरील ही लढाई कायमच क्रिकेट फॅन्ससाठी एक स्पेशल ट्रीट... मात्र, सध्या या ऍशेसमुळेच क्रिकेट जगतामध्ये खळबळ माजली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कचं ऍशेस डायरी 2015 हे पुस्तक येतंय आणि या पुस्तकात त्यानं अनेक खुलासे केलेत. त्यानं या पुस्तकात कोच जॉन बुकानन, अँड्रयू सायमंड्स आणि मॅथ्यू हेडनला टीकेचं लक्ष्य केलंय.
'ऑस्ट्रेलियन टीम इतकी मजबूत होती की, माझा कुत्रा जेरी टीमचा कोच असता तरी आम्हीच वर्ल्ड चॅम्पियन झालो असतो... कोच बुकानन हे देशासाठी कधी खेळले नाहीत' अशा शब्दात त्यानं बुकानन यांच्यावर ताशेरे ओढलेत.
तर २००९ मध्ये इंग्लंडमध्ये अँड्र्यू सायमंड्सनं मद्यपान केलं होतं यामुळे त्याचा करारही मोडण्यात आल्याचा दावा या पुस्तकात त्यानं केलाय.
हेडननं क्लार्क सुरुवातीला मैदानावर सिलीपाईंट आणि शॉर्टलेगला फिल्डिंगसाठी उभं राहण्याचं धाडस करायचा नाही, अशा शब्दात टीका केली होती. माझ्या १२ वर्षांच्या करिअरमधील कामगिरीच माझ्या टीममधील श्रद्धेविषय सांगते. मानाची ग्रीन कॅप परिधान केल्यावर टीमसाठी जीव द्यायची माझी तयारी होती असंही त्यानं या पुस्तकात म्हटलंय.
या खळबळजनक दाव्यांमुळे क्लार्कचं 'ऍशेस डाय़री २०१५' हे पुस्तक निश्चितच बाजारात जास्तीतजास्त खपेल अशी आशा करायला काहीच हरकत नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.