मिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.

Updated: Aug 4, 2015, 09:32 AM IST
मिशन श्रीलंकेसाठी टीम इंडिया कोलंबोमध्ये दाखल title=

कोलंबो: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबोत दाखल झालीय. तीन टेस्ट खेळण्यासाठी विराट कोहलीची टीम सज्ज आहे. दौऱ्यासाठी निघण्याआधी विराटनं आपल्या विजयाचा निर्धार व्यक्त केल.

आक्रमकता कोहलीचं हत्यार

विराट कोहलीनं कॅप्टन बनल्यानंतर लगेच सांगितलं की, त्याच्या नेतृत्वातील टीम ही आधीच्या टीमपेक्षा वेगळी असेल. पारंपरिक पाच बॉलर्ससोबत तो मैदानात उतरेल. कोहलीची एकच स्ट्रॅटिजी आहे, ती म्हणजे 'टेस्ट जिंकण्यासाठी विरोधी टीमला ऑलआऊट करणं हा एकमेव पर्याय असेल.' म्हणजे सर्व 20 विकेट घ्यायला हव्यात. आमच्या जवळ अश्विन सारखा खेळाडू आहे ज्यानं टेस्टमध्ये 40च्या सरासरीनं बॅटिंगही केलीय. भुवनेश्वर कुमार आणि हरभजन सिंह सुद्धा खालच्या फळीत उपयोगी ठरतात. निश्चितच पहिल्या सहा बॅट्समनना महत्त्वाची जबाबदारी सांभाळावी लागेल. 

रोहित शर्मा असेल हुकुमाचा एक्का

विराट कोहलीच्या योजनेनुसार मॅचमध्ये रोहित शर्मा हा हुकुमाचा एक्का असेल. त्याला नंबर-3 वर बॅटिंगसाठी उतरवलं जाईल. आतापर्यंत रोहित टेस्टमध्ये 5व्या किंवा 6व्या नंबरवर खेळायचा. रोहित स्वत: नंबर 4 वर खेळू इच्छितो. पण कॅप्टन कोहली त्याला नंबर तीनवर उतरवेल. 

21 वर्षांनंतर सीरिज जिंकण्यासाठी संधी

गेल्या 21 वर्षात टीम इंडियानं पाच वेळा श्रीलंकेचा दौरा केलाय. 1993 सोडून इतर सर्व सीरिज ड्रॉ राहिल्या. 1985मध्ये टीम इंडिया पहिल्यांदा श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. कपिल देव यांच्या नेतृत्वात तिथं तीन टेस्ट खेळल्या. तीन टेस्ट मॅचची सीरिज भारतानं 1-0नं जिंकली होती. त्याच्या आठ वर्षांनंतर 1993मध्ये पुन्हा एकदा अझरुद्दीनच्या नेतृत्वात टीम इंडियानं सीरिज जिंकली. मात्र त्यानंतर खेळल्या गेलेल्या चार टेस्ट सीरिजपैकी दोन ड्रॉ झाल्या तर दोन श्रीलंकेनं जिंकल्या. त्यामुळं कोहलीजवळ ही सीरिज जिंकण्यासाठी खूप चांगली संधी आहे. 

टीम इंडियाचा श्रीलंकेचा हा सातवा दौरा आहे. 21 वर्षांपूर्वी टीम इंडियानं सीरिज जिंकली होती. त्यामुळं आता विराट कोहलीची टीम इतिहास रचणार का, हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.