मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी आज करो वा मरो

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी रंगणार आहे. पहिल्या दोन सामन्यात सलग हार पत्करल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेत आव्हान कायम राखायचे असल्यास भारताला हा सामना जिंकावाच लागेल. 

Updated: Jan 17, 2016, 08:23 AM IST
मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारतासाठी आज करो वा मरो title=

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी रंगणार आहे.  पहिल्या दोन सामन्यात सलग हार पत्करल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेत आव्हान कायम राखायचे असल्यास भारताला हा सामना जिंकावाच लागेल. 

 

पहिल्या दोन्ही सामन्यात ३००हून अधिक धावा करुनही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. भारताची फलंदाजी चांगली होत असली तरी गोलंदाजांना काही ऑस्ट्रेलियाच्या पिचवर यश मिळालेले नाही. एकाही गोलंदाजाने अद्याप चांगली कामगिरी केलेली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम राखायचे असल्यास भारताकडे उद्या शेवटची संधी आहे. 

 
गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवल्यानंतर पुढील दोन्ही मालिकेत भारताच्या पदरी पराभव पडला. बांगलादेशने त्यांच्या भूमीत भारताला हरवले तर दक्षिण आफ्रिकेने भारताला पराभवाचे पाणी पाजले. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. यानंतर बीसीसीआयने टी-२० विश्वचषकापर्यंत धोनी कर्णधारपदी कायम राहाणार असल्याचे स्पष्ट केले. 

 

धोनी झिम्बाब्वे दौऱ्यात सामील नव्हता. त्यामुळे मोठ्या विश्रांतीनंतर परतणाऱ्या धोनीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र या दोन सामन्यातून तरी तो अपेक्षा पूर्ण करु शकलेला नाही. पर्थच्या मैदानावर रोहित आणि विराटच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर चांगले आव्हान ठेवले होते मात्र ऑस्ट्रेलियन फटकेबाजीसमोर भारताची फटकेबाजी झाकोळली गेली. दुसऱ्या सामन्यातही भारताने चांगली फलंदाजी केली मात्र गोलंदाजीत नेहमीप्रमाणे कच खाल्ली. त्यामुळे आता पुढील सामन्यात यश मिळवायचे असल्यास भारताला गोलंदाजीत सुधारणा कऱणे आवश्यक आहे. नाहीतर काही खरे नाही.