नवी दिल्ली : हाशिम आमला याने इंडियन प्रिमिअर लीगच्या इतिहासात असा फलंदाज बनला आहे, ज्याने एकाच सिझनमध्ये दोन शतक लगावले पण त्याचा संघ दोन्ही वेळेस पराभूत झाला.
आमलाने सर्वात पहिले शतक हे २० एप्रिल रोजी इंदूर येथे मुंबई इंडियन्स विरोधात लगावले होते. पण त्याची टीम आठ विकेटने पराभूत झाली होती. त्यानंतर आमलाने रविवारी ७ मे रोजी शतक लगावले पण तरीही त्याचा संघ पराभूत झाला.
आमला एका सिझनमध्ये दोन शतक बनविणारा तिसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी क्रिस गेल याने २०११ मध्ये दोन शतक लगावले होते. तर विराट कोहलीने मागील वर्षी २०१६ मध्ये दोन शतक लगावले. पण या दोन्ही सामन्यात त्यांच्या संघाला विजय मिळाला होता.
आमलापूर्वी असे सात फलंदाज झाले की त्यांनी शतक करूनही त्यांचा संघ पराभूत झाला आहे. यात अँड्र्यू सायमंड्स,युसूफ पठाण,सचिन तेंडुलकर, शेन वॉटसन, रिद्धीमान साहा, कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांचा समावेश आहे.