इशांत शर्माने घेतली पंतप्रधानांची भेट, दिले लग्नाचे निमंत्रण

टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा येत्या 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतोय. बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे. 

Updated: Dec 3, 2016, 08:34 AM IST
इशांत शर्माने घेतली पंतप्रधानांची भेट, दिले लग्नाचे निमंत्रण title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज इशांत शर्मा येत्या 9 डिसेंबरला विवाहबंधनात अडकतोय. बास्केटबॉलपटू प्रतिमा सिंह हिच्याशी त्याचा विवाह होणार आहे. 

आपल्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी इशांत शर्माने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी इशांसह त्याची होणारी पत्नी प्रतिमाही उपस्थित होती. 

दिल्लीमध्ये इशांत आणि प्रतिमाचा विवाहसोहळा होणार आहे. जूनमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. प्रतिमा मूळची वाराणसी येथील आहे. प्रतिमासह तिच्या चार बहिणीही बास्केटबॉलपटू आहेत. 

2010मधील आशियाई स्पर्धेत प्रतिमाने भाग घेतला होता. इशांत आणि प्रतिमा पहिल्यांदा डीडीए बास्केट बॉलच्या मैदानावर भेटले होते. तेथे त्यांची ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. या दोघांनी अखेर लग्न करण्याचा निर्णय घेतलाय.