बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा अझहरूद्दीन बद्दल अफेयर प्रश्नावर भडकली

माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्याबद्दल अफेयरबाबत एका प्रश्नावर महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा भडकली.

Updated: May 11, 2016, 05:48 PM IST
बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा अझहरूद्दीन बद्दल अफेयर प्रश्नावर भडकली

सूरत : माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन यांच्याबद्दल अफेयरबाबत एका प्रश्नावर महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा भडकली.

ज्वाला गुट्टा सूरतमधील एका शाळेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यासाठी आली होती. त्यावेळी मीडियाने तिला अझरुद्दीन यांच्याबाबत अफेयर असल्याचे चर्चा सुरु आहे. यावरून तिला एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती तीव्र संतापली.

ज्वालाने सांगितले, ही अफवा आहे. तुम्ही लोक हा प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारता. याबाबत मी अनेकवेळा स्पष्ट केलेय. मात्र, हा प्रश्न माझी पाठ सोडत नाही. दरम्यान, अझरुद्दीनच्या जीवनावर एक सिनेमा येत आहे. 'अझहर' असे हा सिनेमा असून तो लवकरच रिलीज होत आहे.