खलीनं घेतला 'त्या' पराभवाचा बदला

डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी खेळाडू खलीनं आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे.

Updated: Feb 29, 2016, 02:36 PM IST
खलीनं घेतला 'त्या' पराभवाचा बदला title=

देहरादून: डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी खेळाडू खलीनं आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानात झालेल्या या सामन्यामध्ये खलीनं कॅनडाच्या ब्रॉडी स्टीलचा पराभव केला आहे. 

चारच दिवसांपूर्वी हल्दवानीमध्ये ब्रॉडीबरोबरच्या मॅचमध्ये खली गंभीर जखमी झाला होता.  डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे खलीला आयसीयुमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

 देहरादूनमध्ये झालेल्या या मॅचला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किशोर उपाध्यायही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचा 'सीएमफॉर यूथ'ला चालना देण्यासाठी भारतीय सामाजिक संस्थेनं या मॅचचं आयोजन केलं होतं.