नवी दिल्ली : रामजस कॉलेजच्या वादात गुरमेहर कौरच्या समर्थनात आता जेएनयुचा विद्यार्थी उमर खालिद देखील उतरला आहे.
क्रिकेटर वीरेंद्र सेहवागच्या ट्विटची निंदा करत खालिदने म्हटलं की, सेहवाग हा बीसीसीआयचा प्रतिनिधित्व करतो, भारताचं नाही.
गुरमेहरच्या समर्थनात लिहिलेल्या फेसबूक पोस्टमध्ये उमरने सेहवागवर टीका केली. मंगळवारी दिल्ली विश्वविद्यालयात जे हजारो विद्यार्थी आणि शिक्षक निदर्शनं करण्यासाठी रस्त्यावर उतरले तेव्हा ते भारताचं प्रतिनिधित्व करत होते. ते एका नव्या भारताचं प्रतिनिधित्व करत होते. ज्याची परिकल्पना समानता, न्याय आणि स्वतंत्र यावर आधारीत आहे.
कारगिल युद्धानंतर शहीद झालेले मनदीप सिंह यांची मुलगी गुरमेहर कौरने रामजस विवादावर ABVPच्या विरोधात ऑनलाइन अभियान सुरु केलं होतं. त्यावर क्रिकेटर विरेंद्र सेहवागने गुरमेहर कौरच्या एका फोटोवर टीका करणारं ट्विट केलं होतं.