पंजाबचा कोलकातावर १४ धावांनी विजय

किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी विजय मिळवलाय.

Updated: May 9, 2017, 11:38 PM IST
पंजाबचा कोलकातावर १४ धावांनी विजय title=

मोहाली : किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर १४ धावांनी विजय मिळवलाय.

पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरला केवळ १५३ धावा करता आल्या. कोलकाताच्या ख्रिस लिनची ८४ धावांची खेळी व्यर्थ ठरली.

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात तडाखेबंद अर्धशतक ठोकणाऱ्या सुनील नरिनेला या सामन्यात केवळ १८ धावा करता आल्या. लिन वगळता इतर फलंदाज फ्लॉप ठरल्याने कोलकाताचा डाव १५३ धावांत संपुष्टात आला.