किंग्स इलेव्हनचे मार्श आणि जॉनसन परतणार मायदेशी

आयपीएल-८च्या प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे शॉन मार्श आणि मिशेल जॉनसन हे स्वदेशी परतणार आहेत. टीमने त्यांना ऑस्ट्रेलियाच्या २७ मे पासून सुरू होणाऱ्या वेस्टइंडीज दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. 

Updated: May 11, 2015, 04:48 PM IST
किंग्स इलेव्हनचे मार्श आणि जॉनसन परतणार मायदेशी title=

मोहाली: आयपीएल-८च्या प्लेऑफमधून बाहेर पडलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे शॉन मार्श आणि मिशेल जॉनसन हे स्वदेशी परतणार आहेत. टीमने त्यांना ऑस्ट्रेलियाच्या २७ मे पासून सुरू होणाऱ्या वेस्टइंडीज दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. 

किंग्स इलेव्हन टीमने व्यवस्थापनाने सांगितले की, 'शॉन मार्श आणि मिशेल जॉनसन यांना आगामी वेस्टइंडीज दौऱ्याच्या तयारीसाठी मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे खेळाडू किंग्ज इलेव्हनचे महत्वाचे खेळाडू आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. आमच्या चांगले खेळाडू आहेत, पुढील सामन्यात चांगल्या खेळाची आम्हाला अपेक्षा आहे.'

किंग्ज इलेव्हनने ११ सामने खेळले आहेत. त्यातील नऊ सामन्यांत त्यांना पराभवांना सामना करावा लागला आहे. त्यांचे अजून तीन सामने शिल्लक आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.