धोनीच्या या रेकॉर्डची कोहलीनं केली बरोबरी

इंग्लंडविरुद्धची तिसरी टी20 जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली. या विजयाबरोबरच कॅप्टन विराट कोहलीनं धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. 

Updated: Feb 2, 2017, 11:21 AM IST
धोनीच्या या रेकॉर्डची कोहलीनं केली बरोबरी  title=

बंगळुरू : इंग्लंडविरुद्धची तिसरी टी20 जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली. या विजयाबरोबरच कॅप्टन विराट कोहलीनं धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. लागोपाठ 7 सीरिज जिंकण्याच्या धोनीच्या रेकॉर्डची कोहलीनं बरोबरी केली आहे. धोनीच्या आधी राहुल द्रविडनं लागोपाठ सहा सीरिज जिंकल्या होत्या.

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजनंतर भारत बांग्लादेशविरुद्ध एक टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ही सीरिज भारतानं जिंकली तर लागोपाठ 8 सीरिज जिंकणारा कोहली पहिला भारतीय कॅप्टन बनेल.