रांची : ग्लेन मॅक्सवेलनं उडवलेल्या दुखापतीच्या खिल्लीला कॅप्टन विराट कोहलीनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रवींद्र जडेजानं डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतल्यानंतर कोहलीनं त्याच्या दुखणाऱ्या खांद्यावर हात ठेवत ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तर दिलं.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर कोहली ड्रेसिंग रूममध्ये गेला आणि ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग संपेपर्यंत फिल्डिंगला आला नाही. भारताच्या बॅटिंगवेळी ग्लेन मॅक्सवेलनं कोहलीच्या या दुखापतीची खिल्ली उडवली होती. सीमारेषेवर फोर अडवल्यावर मॅक्सवेलनं स्वत:च्या खांद्याला हात लावत कोहलीला डिवचलं होतं. मॅक्सवेलच्या या वर्तणुकीवर क्रिकेटविश्वामध्ये टीकाही झाली होती.
Virat Kohli always gives it back in style . #IndvAus pic.twitter.com/Rt05y2ZM3G
— Shashi (@AllTimeBakchod) March 19, 2017