क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू

क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय. 

Updated: Apr 20, 2015, 01:24 PM IST
क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू  title=

नवी दिल्ली : क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय. 

अंकित केसरी तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका मॅचदरमध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला कोलकात्याच्या सिटी हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. इथं, त्याच्यावर उपचार सुरू होते परंतु, आज अंकितनं जगाचा निरोप घेतलाय. आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं अंकितचा मृत्यू झालाय. 

शुक्रवारी सीएबी सीनियर नॉकआऊट टूर्नामेंटमध्ये भवानीपूर क्लबविरुद्ध मॅच खेळताना अंकित गंभीर जखमी झाला होता. कॅच पकडण्याच्या नादात अंकितनं आपल्याच टीमचा खेळाडू सौरव मंडल याला धडकला होता. या धडकेनंतर अंकितची परिस्थिती खूपच बिघडली आणि तो मैदानातच कोसळला. यानंतर त्याला तातडीनं हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं होतं. 

२८ ऑक्टोबर १९९४ रोजी जन्मलेला अंकित केसरी बंगालचा अंडर-१९ इस्ट झोन, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल ११ आणि बंगाल अंडर २३ टीमकडून क्रिकेट खेळलाय. केवळ २० वर्षीय बॅटसमन अंकितननं आत्तापर्यंत ४७ मॅचेस खेळल्यात. 

महत्त्वाचं म्हणजे, नुकतंच काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फिल ह्यूज या २५ वर्षीय क्रिकेटरचा मृत्यूही क्रिकेटच्या मैदानात खेळताना जखमी झाल्यामुळे झाला होता. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स दरम्यान सुरू असलेल्या मॅचमध्ये सीन एबटचा बाऊन्सर डोक्यावर लागल्यानंतर २७ नोव्हेंबर २०१४ रोजी त्याचा मृत्यू झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.