टीम इंडियाने जिंकला नाही टॉस पण आकडे काही वेगळं सांगतात

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून बॅटींगचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाने टॉस जिंकला नसला तरी आकडे काही वेगळं सांगतात. त्यामुळे भारताला अधिक संधी असल्याचे दिसत आहे.

Updated: Mar 26, 2015, 09:02 AM IST
टीम इंडियाने जिंकला नाही टॉस पण आकडे काही वेगळं सांगतात title=

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला असून बॅटींगचा निर्णय घेतला आहे. मात्र, टीम इंडियाने टॉस जिंकला नसला तरी आकडे काही वेगळं सांगतात. त्यामुळे भारताला अधिक संधी असल्याचे दिसत आहे.

दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जोरदार टक्कर होत आहे. भारताने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत. तसेच रनरेटही चांगले आहे. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया भारताच्या मागे आहे.

ऑस्ट्रेलियाने याआधी टॉस जिंकला आहे. एकदा नाही तर १० वेळा. मात्र, दोनवेळाच त्यांना विजय संपादन करता आला आहे. आकड्यांचा विचार केला तर ८ वेळी टॉस जिंकणारी टीम हरली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप सेमीफायनल रंगणार आहे. या सामन्याची खूपच उत्सुकता लागली आहे. विश्वविजेता भारत ऑस्ट्रेलियाला नमवून पुन्हा एकदा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात धडक मारेल, अशी आशा सर्व भारतीय क्रिकेटचाहते करत आहेत.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.