मुंबई : टेनिस जगतातली एकेकाळची सम्राज्ञी आज टेनिस कोर्टवर परतणार आहे.... मारिया शारापोव्हा आज स्टटगार्ड ओपनमध्ये खेळणार आहे. इटलीच्या रॉबर्टा व्हिन्सीशी तिचा सामना होणार आहे.
शारापोव्हा डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर तिच्यावर पंधरा महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीनंतर आज ती पहिल्यांदाच टेनिस कोर्टवर उतरणार आहे, त्यामुळे जगभरातल्या तिच्या चाहत्यांचं या सामन्याकडे लक्ष लागलंय.
35व्या वर्ल्ड मानांकित रॉबर्टा व्हिन्सीशी तिचा मुकाबला होणार आहे. शारापोव्हा डोपिंगमध्ये दोषी आढळल्यानंतर तिच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याचबरोबर तिच्याकडच्या जाहिरात कंपन्यांनीही तिच्याशी कंत्राट रद्द केलं होतं. पण आता टेनिस कोर्टवर पुनरागमन करण्याआधी शारापोव्हा ती एका मॅग्झिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. आता ती ख-या अर्थानं टेनिस कोर्ट गाजवायला सज्ज झालीय.