भारताविरोधात मार्श पिता-पुत्रांचा अनोखा विक्रम

भारताविरूद्ध पाचव्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्श पिता-पुत्रांनी  एक अनोखा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जिऑफ मार्श, तसेच शॉन मार्श आणि मिचेल मार्श यांचे वडील यांनी वनडेमध्ये पहिले शतक भारताविरूद्ध ठोकलं होतं. 

Updated: Jan 23, 2016, 06:12 PM IST
भारताविरोधात मार्श पिता-पुत्रांचा अनोखा विक्रम title=

सिडनी : भारताविरूद्ध पाचव्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्श पिता-पुत्रांनी  एक अनोखा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जिऑफ मार्श, तसेच शॉन मार्श आणि मिचेल मार्श यांचे वडील यांनी वनडेमध्ये पहिले शतक भारताविरूद्ध ठोकलं होतं. 

जिऑफ मार्श यांनी १९८६ मध्ये १२५ रन्स केले होते. त्यांनतर त्यांचा मोठा मुलगा शॉन मार्शने २००९ मध्ये भारताविरुद्ध पहिले शतक केलं होतं. त्यानंतर आज मिचेल मार्शने भारताविरोधातच आपले पहिले शतक झळकले.