मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीमची अजूनही निवड झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारताच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे. क्लार्कनं शिखर धवनऐवजी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेला ओपनर म्हणून पसंती दिली आहे. एक जूनपासून इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ४ जूनला भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर होणार आहे.
रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, युवराज सिंह, एमएस धोनी, सुरेश रैना, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, केदार जाधव, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बूमराह, मोहम्मद शमी