कराची : पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिस्बाह उल हकची महागडी गाडी जप्त करण्यात आली आहे. आपल्या लँड क्रुझर या एसयूव्ही गाडीचा कर चुकविला नसल्याने, केंद्रीय महसूल आणि कर विभागाने त्याची गाडी जप्त केली आहे.
विभागाने सोमवारी ही कारवाई करताना सांगितले, की मिस्बाहने आपल्या अलिशान गाडीचा नियमानुसार कर आणि सीमाशुल्क भरलेले नाही. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ३९ लाख रुपयांचा कर चुकविल्याप्रकरणी मिस्बाहची बँक खाती गोठविण्यात आली होती.
या प्रकरणी मिस्बाहने पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दर यांच्या सोमवारी रात्री चर्चा केल्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला. मिस्बाह सध्या श्रीलंका दौऱ्यावर जाण्याच्या तयारीत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.