आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी

एन. श्रीनिवासन यांची आयसीसीच्या चेअरमनपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसंच शशांक मनोहर यांच्याकडे चेअरमनपदाची धुरा सोपविण्यात आल्याचं कळतंय. मुंबईत आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Updated: Nov 9, 2015, 05:02 PM IST
आयसीसी चेअरमन पदावरून एन. श्रीनिवासन यांची हकालपट्टी title=

नवी दिल्ली: एन. श्रीनिवासन यांना ICCचेअरमन पदावरून हटवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय. मुंबईत आज बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. शशांक मनोहर हे आता आयसीसी चेअरमनपद सांभाळणार आहेत. शशांक मनोहर यांनी बीसीसीआयचं अध्यक्षपद स्वीकारल्यावर सर्वात प्रथम क्रिकेट क्लीन ही आपली प्रथामिकता असणार असल्याचं स्पष्ट केलं होत. यादृष्टीनं त्यांनी काही निर्णयही घेतले. 

श्रीनिवासन यांचे समर्थक सुंदर रमण यांना त्यांनी सर्वात प्रथम आयपीएलच्या सीओओ पदावरून दूर होण्यास भाग पाडलं आणि आता श्रीनिवासन यांनाही आयसीसीसीच्या चेअरमनपदावरून हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे. याचबरोबर माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांनादेखील हितसंबंधाच्या मुद्द्यावरून निवडसमितीतून डच्चू दिल्याची माहिती कळतेय. 

आणखी वाचा - शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

दरम्यान, रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या निवड समितीतून गच्छंती होण्याची शक्यता आहे. हितसंबंध आड येत असल्यानं बीसीसीआय हा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.