नरसिंगच्या भवितव्याचा फैसला आज

कुस्तीपटू नरसिंग यादवची नाडा अर्थातच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीसमोरील सुनावणी गुरुवारीही सुरुच राहील. नाडा याबाबतचा अंतिम निर्णय 

Updated: Jul 28, 2016, 08:29 AM IST
नरसिंगच्या भवितव्याचा फैसला आज title=

नवी दिल्ली : कुस्तीपटू नरसिंग यादवची नाडा अर्थातच नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीसमोरील सुनावणी गुरुवारीही सुरुच राहील. नाडा याबाबतचा अंतिम निर्णय आज देणार आहेत. त्यामुळे नरसिंगच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. 

दरम्यान, दुस-या डोपिंग टेस्टमध्येही तो नापास झालाय. 5 जुलैला ही टेस्ट करण्यात आली होती. या टेस्टमधील ए आणि बी या दोन्ही सँपल्समध्ये त्याच्या शरिरात उत्तेजक द्रव्यांचा अंश आढळलाय. 

दरम्यान, 25 जूनला झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये तो दोषी आढळला होता. आणि त्यामुळेच त्याच्यावर तात्पुरत्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.