पाकिस्तानच्या आमिरची न्यूझीलंडमध्येही हुर्यो

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जेलची हवा खाऊन आलेला पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिरला सध्याचा न्यूझीलंड दौरा वेगळ्या अर्थानं खडतर जातोय. 

Updated: Jan 28, 2016, 03:55 PM IST
पाकिस्तानच्या आमिरची न्यूझीलंडमध्येही हुर्यो title=

वेलिंग्टन : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी जेलची हवा खाऊन आलेला पाकिस्तानी बॉलर मोहम्मद आमिरला सध्याचा न्यूझीलंड दौरा वेगळ्या अर्थानं खडतर जातोय. प्रेक्षकांपासून ते न्यूझीलंड क्रिकेटच्या अधिकृत ग्राऊंड अनाऊंसरपर्यंत अनेक जण त्याची हुर्यो उडवतायत.

पहिल्या टी-20 सामन्यात आमिरनं रनअप घ्यायला सुरूवात केल्यानंतर वेलिंग्टनचे प्रसिद्ध अनाऊंसर मार्क मॅकलिऑड यांनी कॅश रजिस्टरचा साऊंड वाजवला. याबद्दल न्यूझीलंड क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाची माफी मागितलीये. 

दुसरीकडे मॅचदरम्यान प्रेक्षकांनी आमिरला डॉलर्सच्या नोटा दाखवल्या. याची पाकिस्तानी खेळाडूंनी पंचांकडे तक्रार केल्यानंतर त्या प्रेक्षकांना दम देऊन सोडून देण्यात आलं.