वनडे क्रिकेटमधूनही धोनी निवृत्ती घेणार

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करणार आहे. अचानक निवृत्तीचा धोनीने का विचार केलाय हे अजूनही समजू शकलेलं नसलं तरी, टीम इंडियावर सतत होणारी टीका हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Apr 1, 2015, 08:27 PM IST
वनडे क्रिकेटमधूनही धोनी निवृत्ती घेणार title=

मुंबई : वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करणार आहे. अचानक निवृत्तीचा धोनीने का विचार केलाय हे अजूनही समजू शकलेलं नसलं तरी, टीम इंडियावर सतत होणारी टीका हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

महेंद्रसिंह धोनी लवकरच याबाबतीत घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. धोनीने या पूर्वी निवृत्ती घेणार नसल्याचं म्हटलं होतं, आपल्याला अजून म्हातारपण आलं नाही, असंही धोनीने म्हटलं होतं, मात्र कोहलीला दिवसेंदिवस दिलं जाणारं महत्व आणि बीसीसीआयचं झुकतं माप यामुळे महेंद्रसिंह धोनी व्यथित झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

डिस्क्लेमर: ही पूर्ण फेक बातमी आहे. १ एप्रिल असल्याने एक विनोद, गंमत म्हणून ही बातमी बनवण्यात आली आहे, वास्तवाशी या बातमीची काहीही संबंध नाही, तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर झी २४ तासची ऑनलाईन टीमकडून आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.