नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या आगामी भारत दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्यासाठी माजी क्रिकेटपटू मायकेल हसीने खास टिप्स दिल्यात. येत्या २३ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेस सुरुवात होतेय.
सध्या कर्णधार विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे. विराटचा फॉर्म पाहता तो ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसाठी मोठे आव्हान ठरु शकतो. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सगळ्या गोलंदाजांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. विशेष रणनीती आखणे गरजेचे असल्याचे हसीने म्हटलेय.
मायकेल हसीने ऑस्ट्रेलियाकडून ७९ कसोटींमध्ये प्रतिनिधित्व केले. यात त्याने ६२३५ धावा केल्या. भारताविरुद्धच्या अनेक सामन्यांमध्ये त्याने चांगल्या खेळी केल्या.
२०१२मध्ये जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा या दौऱ्यात हसीने १५० धावांची शानदार खेळी केली होती. हसीने २०१३मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.