लियांडर पेस, सानिया मिर्झाची विम्बल्डमध्ये छाप

 भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसने आपला पार्टनर राडेक स्टेपनिकसमवेत विम्बल्डमध्ये डबल्सच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय.

AP | Updated: Jul 4, 2014, 08:08 AM IST
लियांडर पेस, सानिया मिर्झाची  विम्बल्डमध्ये छाप title=

लंडन : भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेसने आपला पार्टनर राडेक स्टेपनिकसमवेत विम्बल्डमध्ये डबल्सच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीय.

क्वार्टर फायनलमध्ये पाचव्या सीडेड पेस-स्टेपनिक जोडीने तिस-या सीडेड सर्बियन-कॅनडियन नेनाद झिमॉन्जिक आणि डॅनिएल नेस्टॉर जोडीवर 3-6, 7-6, 6-3, 6-4ने विजय साकारला.

आता सेमी फायनलमध्ये पेस-स्टेपनिकचा मुकाबला वॅसेक पॉस्पिसिल- जॅक सॉक आणि एलेक्झांडर पेया-ब्रुनो सोअर्स यांच्यामधील विजेत्याशी होईल. 

तर दुसरीकडे भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि होरिया टेकाऊ या जोडीने विम्बल्डनच्या मिक्स डबल्सच्या प्री-क्वार्टरमध्ये प्रवेश केलाय. सानिया आणि रोमन जोडादार टेकऊने माटे पाविच-बोजाना जोवानोवस्कीवर 6-3, 6-3ने विजय साकारला. सानिया आणि टोकाऊने पूर्ण मॅचमध्ये आपला दबदबा कायम राखला.

सानिया-टेकाऊने 58 पॉईंट्सची कमाई केली तर प्रतिस्पर्धांयी 33 पॉईंट्सची नोंद केली. आता सानिया-टेकाऊचा आगामी मुकाबला 10व्या सीडेड जॅमी मुर्रे आणि कॅसे डेलाकुआ यांच्याशी होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.